ठळक बातम्या

महापालिका रुग्णालयांत उद्यापासून मुखपट्टी सक्ती

मुंबई दि.१० :- बृहन्मुंबई महापालिका रुग्णालयात उद्यापासून (मंगळवार) मुखपट्टी सक्ती करण्यात आली आहे. बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. तसेच बृहन्मुंबई महापालिका कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी मुखपट्टी लावावी, असे आवाहनही महापालिका प्रशासनाने केले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा- किरीट सोमय्या

महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. राज्यात करोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर करोनाचा संसर्ग वाढण्याआधीच महापालिका प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय केले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *