पाणी देयक वसुली मोहिमेत वर्षभरात ८ हजार ५७१ थकबाकीदारांच्या नळजोडण्या खंडीत

ठाणे दि.१० :- ठाणे महापालिका प्रशासनाने पाणी देयकांच्या वसुलीसाठी गेले वर्षभर राबविलेल्या विशेष मोहिमेत ८ हजार ५७१ थकबाकीदारांच्या नळजोडण्या खंडीत करण्यात आल्या आहेत. तसेच गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षात पाणी देयंकाच्या वसुलीतही १४ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे.
ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या आदेशानुसार पाणी पुरवठा विभागाचे उपनगर अभियंता विनोद पवार यांच्या पथकाने वर्षभर विशेष मोहिमा राबविल्या.

मोर्बी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ६.५० कोटी रुपयांच्या मालमत्तांचा २० एप्रिलला लिलाव

त्यात देयकांचा भारणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्यांविरोधात कठोर भुमिका घेऊन त्यांच्या नळजोडण्या खंडीत करण्याची कारवाई केली. वर्षभरात ८ हजार ५७१ नळ जोडण्या खंडीत करण्यात आल्या. त्यापैकी वागळे इस्टेट भागात सर्वाधिक म्हणजेच २ हजार ८२० नळजोडण्या खंडीत करण्यात आल्या. त्याखालोखाल कळवा भागात १ हजार ७२३, दिवा भागात १ हजार ३०३, मुंब्रा भागात १ हजार १४५ नळजोडण्या खंडीत करण्यात आल्या.

कामगारांच्या हितासाठी कंत्राटी कामगार कायद्याची पुनर्रचना करावी – भारतीय मजदूर संघाची मागणी

थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्याबरोबरच पालिकेने नियमित पाणी देयंकाच्या वसुलीवरही भर दिला होता. गेल्या वर्षभरात १३४ कोटी ४६ लाख ४३ हजार ७८४ रुपयांच्या पाणी देयकाची वसुली पालिका प्रशासनाने केली आहे. त्याआधीच्या वर्षात १२० कोटी ५ लाख ३२ हजार ८९६ रुपयांच्या पाणी देयकांची वसुली झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.