मोर्बी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ६.५० कोटी रुपयांच्या मालमत्तांचा २० एप्रिलला लिलाव
पनवेल दि.१० :- मोर्बी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील ६.५० कोटी रुपयांच्या मालमत्तांचा येत्या २० एप्रिलरोजी लिलाव केला जाणार आहे. ‘महारेरा’च्या ३३ आदेश प्रकरणातील विकासकांच्या जप्त मालमत्तांचा हा लिलाव असून त्यातून जमा होणारी रक्कम संबंधित तक्रारदाराला दिली जाणार आहे. मौजे मोर्बेच्या ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी अकरा वाजता हा लिलाव होणार आहे.
कामगारांच्या हितासाठी कंत्राटी कामगार कायद्याची पुनर्रचना करावी – भारतीय मजदूर संघाची मागणी
इच्छुकांना येत्या १९ एप्रिलपर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून) सकाळी ११ ते ३ या वेळेत मालमत्ता पाहण्याची सोय पनवेल तहसील कार्यालयाने केली आहे. ‘महारेरा’कडे मोठ्या प्रमाणात खासगी विकासकांच्या विरोधात तक्रारी दाखल होत आहेत. त्यानुसार ग्राहकांची फसवणूक झाल्याचे, रेरा कायद्याचे उल्लंघन झाल्याचे सिद्ध झाल्यानंतर महारेराकडून तक्रारदाराने मालमत्तेसाठी विकासकाकडे भरलेली रक्कम व्याजासकट परत करण्याचे आदेश दिले जातात.
रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी ३३ प्रवाशांचे प्राण वाचविले
मात्र या आदेशाचे पालन जे विकसक करत नाहीत त्यांच्याविरोधात महारेराकडून वसूली आदेश अर्थात रिकव्हरी वॉरंट काढले जाते. त्यानुसार विकासकाच्या मालमत्तेचा लिलाव करून त्यातून येणारी निश्चित रक्कम संबंधित तक्रारदाराला देण्यात येते. ही प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. मात्र जिल्हाधिकारी वसूली आदेशाची अंमलबजावणी करत नसल्याने थकीत रक्कम वाढत असून ग्राहक, तक्रारदारांना प्रतीक्षा करावी लागत होती.