ठळक बातम्या

दुष्काळी परिस्थितीत कोणीरी मदतीपासून वंचित राहणार नाही, यादीत समावेश न झालेल्या तालुक्यांचीही तपासणी होणार

दुष्काळी परिस्थितीत कोणीरी मदतीपासून वंचित राहणार नाही, यादीत समावेश न झालेल्या तालुक्यांचीही तपासणी होणार

राज्यात अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये समावेश न झालेल्या तालुक्यांचीही तपासणी करून ट्रिगर 3 अंतर्गत मदत देण्यात येईल. दुष्काळी परिस्थितीत कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर* *शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना लागू!*

पर्जन्यमानातील तूट व अन्य घटकांनी प्रभावित झालेल्या 265 तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली असून, या तालुक्यांमध्ये 12 उपाययोजना व सवलती लागू करण्यात आल्या आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शेतपिकाच्या नुकसानीची मदत विहित कार्यपद्धतीची पूर्तता करून दिली जाईल. तसेच, ज्या तालुक्यांचा समावेश झाला नाही, अशा सर्व तालुक्यांची तपासणी करून ट्रिगर 3 मध्ये समावेश करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, प्रत्येक जिल्ह्याचा आराखडा तयार करण्यात आला असून, त्यानुसार पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात येईल. राज्यातील बहुतांश प्रकल्पांमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध असून, जुलै-ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याचे आरक्षण ठेवून अतिरिक्त उपलब्ध असलेले पाणी रब्बीसाठी देता येईल का, याचाही प्राधान्याने विचार करण्यात येणार आहे.

हिंगोलीच्या आदिवासी विद्यार्थ्यांनी रचला इतिहास; 15 मिनिटांत हस्तलिखित संपूर्ण भगवद्गीता

अल निनोमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा अभ्यास केला जाणार असून फेब्रुवारीअखेरपर्यंत उच्चांक पातळी गाठण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक उपाययोजना प्राधान्याने पूर्ण करण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना जनतेनेही सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. अनावश्यक खर्च टाळून दुष्काळग्रस्त भागांमध्ये कशी मदत करता येईल, ती सर्वांनी करावी, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

दादरमध्ये विद्यार्थ्यांसाठी भविष्यातील तंत्रज्ञानाचे दालन खुले; छबिलदास शाळेत अत्याधुनिक AI, गणित आणि रोबोटिक्स लॅबचे उद्घाटन

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथे छत्तीसगडमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पूरपरिस्थितीमध्ये सरकारकडून संपूर्ण मदत देण्यात येत असून, मी स्थानिक प्रशासनाच्या सातत्याने संपर्कात असल्याचे सांगताना पूरपरिस्थिती निवळत असून जनजीवन पूर्वपदावर येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.