सामाजिक

पुणे: शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व स्व. डॉ. श्रीपाद ढेकणे यांना फर्ग्युसन महाविद्यालयात वाहिली जाणार श्रद्धांजली

पुणे:

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी पूर्णवेळ कार्यकर्ते, माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे स्वीय सहाय्यक (OSD) तसेच मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष अधिकारी म्हणून कार्य केलेले शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व स्व. डॉ. श्रीपाद ढेकणे यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी पुणे येथे विशेष ‘श्रद्धांजली सभेचे’ आयोजन करण्यात आले आहे. ‘डॉ. श्रीपाद ढेकणे मित्रपरिवारा’तर्फे ही सभा आयोजित करण्यात आली आहे.

उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आश्वासनानंतर भारतीय मजदूर संघांचे शिक्षक दिनाचे धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित

कार्यक्रमाची सविस्तर माहिती:

दिनांक: ९ सप्टेंबर २०२६

वेळ: सायंकाळी ६.०० ते ८.००

स्थान: ॲम्फी थिएटर, फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे

प्रमुख उपस्थिती: मा. विनोद तावडे (खासदार – राज्यसभा)

विद्यार्थी चळवळ ते राज्याच्या शिक्षण धोरणात महत्त्वपूर्ण योगदान:

स्व. डॉ. श्रीपाद ढेकणे यांनी १९८३ मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) माध्यमातून आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात केली होती. पुणे, सोलापूर, कोकण आणि गोवा परिसरात संघटनमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. खडकी येथील टी. जे. महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य करतानाच त्यांनी ‘महापालिकांच्या अंदाजपत्रकांचा तौलनिक अभ्यास’ या विषयावर पीएच.डी. पूर्ण केली.

Turning Pages – Transforming Society’: रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टतर्फे प्रा. मिलिंद मराठे यांच्या व्याख्यानाचे आयोजन

राज्याच्या शिक्षण मंत्रालयात आणि मुख्यमंत्री कार्यालयात विशेष अधिकारी (OSD) म्हणून काम करताना त्यांनी नवीन विद्यापीठ कायदा व खासगी विद्यापीठ कायद्याच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले. भाजपाचे पुणे शहर प्रवक्ते म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली होती.

या श्रद्धांजली सभेच्या माध्यमातून स्व. डॉ. श्रीपाद ढेकणे यांच्या सामाजिक, शैक्षणिक व संघटकीय जीवनकार्याला आणि त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जाणार आहे.

कार्यक्रमाशी संबंधित अधिक माहितीसाठी डॉ. सुनील भंडगे (९९६०५ ००८२७) किंवा प्रा. शरदचंद्र बोटेकर (९८२२९ ९१३९१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. श्रीपाद ढेकणे मित्रपरिवारातर्फे करण्यात आले आहे.