शैक्षणिक

Turning Pages – Transforming Society’: रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टतर्फे प्रा. मिलिंद मराठे यांच्या व्याख्यानाचे आयोजन

डोंबिवली:

मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे कमी होत चाललेली वाचनाची सवय आणि त्याचा समाजाच्या विचारविश्वावर होणारा परिणाम या पार्श्वभूमीवर, वाचन संस्कृतीच्या पुनरुज्जीवनासाठी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टतर्फे एका विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. मिलिंद मराठे “Turning Pages – Transforming Society” या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

हे व्याख्यान आज बुधवार, २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजता डोंबिवली (पूर्व) येथील पेंढारकर कॉलेजसमोरील रोटरी भवन येथे पार पडणार आहे.

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ‘उदयंतु’चा शुभारंभ; शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ४० विद्यार्थ्यांची निवड

वाचन आणि सामाजिक विवेक: वाचन ही केवळ माहिती मिळवण्याचे साधन नसून, मानवी विचारांना दिशा देणारी, विवेकबुद्धी जागवणारी आणि संवेदनशील नागरिक घडवणारी प्रक्रिया आहे.

घराघरांतून वाचन चळवळीची गरज: मोठ्या उपक्रमांपेक्षा प्रत्येक घरात दररोज ठराविक वेळ वाचनासाठी देणे, मुलांच्या हातात मोबाईलऐवजी पुस्तके देणे आणि कुटुंबात पुस्तकांवर चर्चा करणे आवश्यक आहे.

स्थानिक पातळीवरील उपक्रम: परिसरात ‘वाचन कट्टा’ किंवा ‘बुक क्लब’ सुरू करणे आणि पुस्तकांची देवाणघेवाण करून वाचन संस्कृती वाढवणे ही काळाची गरज असल्याचे प्रा. मराठे आपल्या व्याख्यानातून मांडणार आहेत.

क्षयरोगमुक्तीच्या दिशेने सामाजिक बांधिलकीचे महत्त्वपूर्ण पाऊल: रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टतर्फे ‘निक्षय मित्र प्रकल्पा’चा भव्य शुभारंभ

या कार्यक्रमाचे आयोजन ‘Team IGNITE’ च्या वतीने करण्यात आले आहे. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्टचे अध्यक्ष रो. अथर्व जोशी, मानद सचिव रो. सुबोध पटवर्धन, टीम कॅप्टन रो. पूनम बोबडे आणि टीम मेंटॉर PP दशरथ डोंगरे यांनी सर्व नागरिक, शिक्षणप्रेमी व वाचकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.