डोंबिवली विधानसभा मतदारसंघात धक्कादायक प्रकार जिवंत मतदारांना मयत दाखवून मतदार यादीतून नावे वगळली
डोंबिवली: डोंबिवली विधानसभा मतदारसंघ क्रमांक १४३ मध्ये अत्यंत गंभीर व धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही नागरिक जिवंत असतानाही त्यांना “मयत” दाखवून त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे.
डोंबिवली पूर्वेतील पेंडसे नगरचे शाखा प्रमुख हेमंत गिमावकर आणि युवा शाखा अधिकारी अनुज मोरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहर प्रमुख तथा डोंबिवली १४३ विधासभेचे अधिकृत बी एल ए १ प्रमोद कांबळे यांच्या हि बाब निदर्शनास आणुन दिली.सदर मतदार संघात कांबळे यांनी माहिती घेतली असता असे अनेक मतदारांच्या बाबतीत घडलेल्याचे समोर आले आहे. हा प्रकार लोकशाही प्रक्रियेवरील नागरिकांचा विश्वास डळमळीत करणारा असून याची सखोल चौकशी होणे अत्यावश्यक आहे.
डोंबिवलीत बीएलओ (BLO) राजकीय कार्यालयात? मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेवर गंभीर प्रश्नचिन्ह
मतदार नोंदणी अधिकारी यांनी संबंधित प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन जिवंत नागरिकांची नावे कोणत्या आधारावर व कोणत्या प्रक्रियेनुसार वगळण्यात आली, याची सविस्तर चौकशी करावी. दोषी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी. तसेच ज्या नागरिकांची नावे चुकीने वगळण्यात आली आहेत, त्यांची नावे तात्काळ मतदार यादीत पुन्हा समाविष्ट करावीत, अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाने केली आहे.
या प्रकारामुळे नागरिकांमध्ये विविध शंका निर्माण होत आहेत. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबवून वस्तुस्थिती जनतेसमोर आणणे ही निवडणूक प्रशासनाची जबाबदारी आहे.
जर या गंभीर प्रकाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात आली नाही, तर लोकशाहीच्या रक्षणासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी. असे निवेदन प्रमोद कांबळे यांनी विधानसभा१४३ डोंबिवली मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात भेट घेऊन दिले त्यावेळी सोबत शाखा प्रमुख तथा यादी क्रमांक २३९ चे बी एल ए हेमंत गिमावकर आणि युवा शाखा अधिकारी तथा यादी क्रमांक २४१ चे बी एल ए अनुज मोरे उपस्थित होते.

