गुन्हे-वृत

कल्याण सामूहिक बलात्कार प्रकरण: पीडितेच्या जातीवरून संभ्रम कायम; स्थानिक हिंदू संघटनांकडून ‘लव्ह जिहाद’चा संशय व्यक्त, परिसरात खळबळ

कल्याण

कल्याणमध्ये एका उच्चपदस्थ तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून झालेल्या सामूहिक बलात्कार आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणाला आता एक नवे गंभीर वळण मिळाले आहे. या प्रकरणातील पीडित तरुणीच्या जातीबाबत पोलीस माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप केला जात आहे. पोलिसांच्या या भूमिकेमुळे स्थानिक पातळीवर संशय बळावला असून, अनेक स्थानिक हिंदू संघटनांनी हे ‘लव्ह जिहाद’चेच प्रकरण असल्याचा संशय व्यक्त केला आहे. यामुळे संपूर्ण कल्याण परिसरात सध्या तीव्र संताप आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी अरबाज खान याला नुकतीच मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली असून, पोलीस आता या प्रकरणाच्या सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

‘यू-डायस प्लस’ अहवालाचे वास्तव: महाराष्ट्राच्या शैक्षणिक प्रगतीचा बुरखा फाडणारी आकडेवारी

काय आहे संपूर्ण प्रकरण?

कल्याणच्या एका हायप्रोफाइल परिसरात राहणाऱ्या आणि नामांकित कंपनीत उच्च पदावर कार्यरत असलेल्या तरुणीला अरबाज खान याने लग्नाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले होते. तिच्या असहायतेचा फायदा घेत अरबाजने तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ शूट केले. त्यानंतर त्याने हे व्हिडिओ त्याचे मित्र मोईनउद्दीन खान, पलालु आणि स्वतःचे वडील सलीम खान यांना दाखवून पीडितेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

मुख्य आरोपी अरबाज हा गुन्हा केल्यानंतर ओमानला पळून गेला होता. त्याच्या गैरहजेरीत त्याचे मित्र मोईनउद्दीन आणि पलालु यांनी पीडितेवर वारंवार सामूहिक बलात्कार केला, तर अरबाजच्या वडिलांनीही पीडितेचा छळ करण्याचा प्रयत्न केला. या नराधमांच्या जाचाला कंटाळून अखेर पीडित तरुणीने पोलिसांत धाव घेतली होती.

डोंबिवलीत बीएलओ (BLO) राजकीय कार्यालयात? मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेवर गंभीर प्रश्नचिन्ह

पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; हिंदू संघटना आक्रमक

पीडित तरुणी ही विशिष्ट समाजातील (हिंदू) असून जाणीवपूर्वक तिला टार्गेट करण्यात आले आहे का, या बाजूने आता चर्चा सुरू झाली आहे. मात्र, तपासादरम्यान पीडितेच्या जातीबाबत किंवा पार्श्वभूमीबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यास पोलीस प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप स्थानिक संघटनांनी केला आहे.

पोलिसांच्या या गुप्ततेमुळे आणि आरोपींच्या विशिष्ट धर्मीय पार्श्वभूमीमुळे (अरबाज खान, मोईनउद्दीन खान आणि सलीम खान) स्थानिक हिंदू संघटना कमालीच्या आक्रमक झाल्या आहेत. नियोजित कट रचून हिंदू मुलीला जाळ्यात ओढण्याचा हा ‘लव्ह जिहाद’चाच प्रकार असल्याचा संशय या संघटनांनी जाहीरपणे व्यक्त केला असून, या प्रकरणात पोलीस दबावाखाली काम करत आहेत का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

पुण्यातील आषाढी वारी उत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी; संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांना अभिवादन

आरोपींवर कडक कारवाईची मागणी

या अत्यंत घृणास्पद गुन्ह्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे. हिंदू संघटनांनी या प्रकरणात निष्पक्ष आणि जलद तपास करण्याची मागणी केली आहे. पीडितेला तात्काळ न्याय मिळावा आणि फरार आरोपींना तात्काळ बेड्या ठोकल्या जाव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात येत आहे.