Tuesday, July 7, 2026
Latest:
ठळक बातम्या

एशियाटिक सोसायटी निवडणूक: ज्ञानाधिष्टित सर्वसमावेशकतेचा विजय आणि अहंकारलोलुप संकुचितता जातीयवादाचा पराभव

प्राचीन ज्ञान-संशोधन केंद्राचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘एशियाटिक सोसायटी’ ऑफ मुंबई च्या निवडणुकीने या संस्थेच्या इतिहासात एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि वळण देणारा संदेश दिला आहे. जागरूक आणि एशियाटिक हितैषी मतदारांनी दिलेल्या कौलाने संस्थेचे व्यापक हित हे वैयक्तिक अहंकार आणि संकुचित राजकारणापेक्षा नेहमीच मोठे असते हे सिद्ध केले आहे.

मतदारांनी “एशियाटिक टुमारो” पॅनलला भरघोस ज्ञानाधिष्टित सर्वसमावेशकतेचा विजय आणि अहंकारलोलुप संकुचितता जातीयवादाचा पराभव देऊन विजयी केले असून, हा विजय सात्विकता, नम्रपणा, अभ्यासपूर्ण दृष्टी आणि एशियाटिक विषयी असलेल्या खऱ्या आस्थेचा आहे.

•विधायक विरुद्ध संकुचित भूमिका:

दोन विचारसरणींमधील मुख्य लढत ही सर्वसमावेशकता विरुद्ध वैचारिक अस्पृश्यता अशी होती.

“एशियाटिक टुमारो” पॅनलने सुरुवातीपासूनच व्यक्तींपेक्षा संस्थेला केंद्रस्थानी ठेवणारी अत्यंत उदारमतवादी, एशियाटिक हिताची आणि संस्थेच्या व्यापक विकासाची कृतिशील भूमिका मांडली होती. या पॅनलच्या अजेंड्यात

लोकाभिमुखीकरण:संस्था केवळ काही ठराविक लोकांपुरती मर्यादित न राहता ती सर्वसामान्य अभ्यासक, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांसाठी खुली व्हावी.

आर्थिक व संस्थात्मक सक्षमता: दुर्मिळ ग्रंथांचे जतन करण्यासाठी आणि संस्थेच्या दैनंदिन कामकाजासाठी ठोस आर्थिक आराखडा उभे करणे.

ज्ञान-संशोधनाला चालना: आधुनिक माहिती व संशोधन केंद्र विकसित करून विद्यार्थी, संशोधक आणि शैक्षणिक संस्थांशी अधिक सशक्त नाते निर्माण करणे.

कर्मचारी कल्याण: संस्थेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हिताचा सकारात्मक विचार करून त्यांचे प्रश्न सोडवणे असे मुद्दे होते.

याउलट, विरोधी पॅनल असलेल्या ‘सेव्ह एशियाटिक’ यांनी निवडणुकीत मुद्देसूद आणि विकासाभिमुख चर्चा करण्याऐवजी अहंकारलोलुपतेतून अत्यंत संकुचित, जातीयवादी आणि भाषिक राजकारण करण्याचा प्रयत्न केला. “समोरच्या पॅनलसह मतदारांना काय कळतं?” अशी उद्धट आणि अहंकारी भूमिका घेऊन त्यांनी निवडणुकीला वैयक्तिक पातळीवर नेले आणि मुद्द्यांऐवजी केवळ भावनेचा बाजार मांडला. मात्र, एशियाटिकच्या सुज्ञ आणि जागरूक मतदारांनी ही “पुरोगामी-न्यू लेफ्ट-सेक्युलर” दहशत पूर्णपणे नाकारली. त्यांच्या या प्रचारशैलीला चपराक लगावली. कोणत्याही संस्थेची निवडणूक ही विभागणीवर नव्हे, तर विश्वास, संवाद आणि कार्यक्षमतेवर लढणे आवश्यक आहे हा या निकालाचा अर्थ आहे.

•बदलाचे वारे आणि संस्थात्मक पुनरुत्थानाची आशा

“एशियाटिक टुमारो”‘चा हा विजय सृजनशीलता आणि विधायकतेचा आहे. दोनशे बावीस वर्षांची परंपरा असलेल्या या ज्ञानसंस्थेला नव्या काळाशी जोडण्याची ही मोठी संधी आहे. या विजयामुळे आता एशियाटिकला एक वेगळे आणि सकारात्मक वळण लागून ती दक्षिण मुंबईच्या भौगोलिक सीमा आणि मर्यादेतून बाहेर पडेल आणि शैक्षणिक क्षेत्राशी व्यापक स्तरावर जोडली जाण्याची शक्यता वाढली आहे.

या बदलामुळे भविष्यात अत्यंत सकारात्मक परिणाम पहायला मिळतील.

पायऱ्या केवळ ‘सेल्फी पॉईंट’ राहणार नाहीत: एशियाटिकच्या ऐतिहासिक पायऱ्या केवळ छायाचित्रण किंवा चित्रपट चित्रीकरणाचे (शूटिंग) आकर्षण म्हणून ओळखल्या जाऊ नयेत; तर त्या अधिक स्वागतशील होऊन अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी आणि ज्ञानप्रेमींना आत येण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या ठराव्यात.

ज्ञानप्रवाह आणि दस्तऐवाजांचे जतन: संस्थेची दारे सर्वांसाठी खुली होतील. दुर्मिळ ग्रंथ, हस्तलिखिते आणि ऐतिहासिक कागदपत्रे यांवरील धूळ झटकून ती आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिकाधिक संशोधनासाठी उपलब्ध करून दिली जातील.

कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य: संस्थेतील अंतर्गत वातावरण अधिक लोकाभिमुख आणि सर्जनशील झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलेल. हा बदल केवळ व्यवस्थापनाचा नसून संस्थेच्या संस्कृतीचा असेल.

•सक्षम नेतृत्व आणि भविष्यातील वाटचाल

निवडणूक जिंकणे ही केवळ एक सुरुवात असते, खरी कसोटी त्यानंतर सुरू होते. विजयी झालेल्या ‘एशियाटिक टुमारो’ पॅनलकडून सदस्यांच्या अपेक्षाही आता खूप मोठ्या आहेत. दिलेली आश्वासने प्रत्यक्ष कृतीत उतरविणे, संस्थेची पुन: उभारणी करणे, संशोधनाला चालना देणे, नव्या पिढीला एशियाटिकशी जोडणे आणि संस्थेच्या गौरवशाली परंपरेला भविष्यकालीन दृष्टी देणे, ही आता मुख्य जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांच्या आगामी कामाकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहील.

डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या कुशल, कल्पक आणि दूरदर्शी नेतृत्वात ‘एशियाटिक टुमारो’ पॅनल या अपेक्षां पूर्ण करून भरीव कामगिरी करतील या विश्वासासह सर्व विजयी उमेदवारांचे, एकोणीस जणांच्या पूर्ण पॅनलचे मनःपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा!

1804 ते 2026 या दोनशे बावीस वर्षात राष्ट्रीय विचारांचे जे जागतिक बदलाचा वेध घेऊ शकतात असे पूर्ण पॅनल पहिल्यांदा निवडून आले आहे. हे सर्वजण कार्यकर्ता मानसिकतेचे आहेत. एशियाटिकच्या फेम मध्ये न अडकता एशियाटिकला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी कृतीशील रहाणारे आहेत. वसाहतवादी मानसिकतेकडून भारतीय मानसिककतेकडे आता वाटचाल सुरु होईल.

अर्थात, पराभूत पॅनल थयथयाट करेल. या निकाला विरुद्ध न्यायालयात जाईल. रडीचे डाव टाकले जातील. कारण, हातून एक जागतिक कीर्तीचे, प्रतिष्ठेचे व्यासपीठ हातून गेले आहे. सोईस्कर अजेंडा मांडण्याची जागा हातून गेली आहे. त्यामुळे एशियाटिक सोसायटीचा गायपट्टा करणार अशी बोंब सुरु होईल. पराभूत आणि त्यांचे समर्थक आता गळे काढतील.

पण, सत्य बदलणार नाही.

  1. समन्वयी उदारमतवाद जिंकला असून, उद्दाम, अहंकारग्रस्त संकुचित जातीयवाद पराभूत झाला आहे. एशियाटिकच्या निवडणूक निकाल देशातील संस्था जीवनाची दिशा बदलणारा ठरेल.

बाकी, 2530 पैकी 517 मतदारांनी मतदान केले. मतदान बॅलेट पेपरवर होते. 50 प्रमाणे दहा अधिक एक अश्या अकरा फेऱ्या झाल्या. अकराही फेऱ्यात एशियाटिक टुमारो आघाडीवर राहिले.

लेखक – मकरंद मुळे©ठाणे
पत्रकार, विश्लेषक, विविध विचारांचे अभ्यासक

अंतिम निकाल

President
Vinay Sahasrabuddhe : 349

======
Secretary:
Vivek Ganpule 352

=====

Vice president:
Ramesh Patange 329
Nitish Bharadwaj 328
Dwiwedi327
Deshmukh 323
=====
Managing Committee:
Prachi Moghe 341
Madhav Bhandari 339
Malhar Kulkarni 333
Pramod Bapat 329
v chakravarthy 324
Rajesh Behare 321
====
Scrutinization:
Snehal Nagarkar 370
Abhijeet Mulye 362
Madhavi 362
Umang Kale 358
Amog Jadhav 349
Malhar Gokhale 348
Dattatray Panchwagh 344