‘खरा सांता क्लॉज दाखवा आणि १ लाख मिळवा!’; हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे कोल्हापुरात आव्हान
कोल्हापूर (प्रतिनिधी): ‘ख्रिसमस’च्या नावाखाली मुलांमध्ये पसरवली जाणारी ‘सांता क्लॉज’ची संकल्पना ही पूर्णपणे भ्रामक असून, या माध्यमातून मुलांचे सांस्कृतिक धर्मांतरण केले जात आहे. खरा सांता क्लॉज अस्तित्वात आहे हे सिद्ध करणाऱ्यास १ लाख रुपयांचे पारितोषिक देऊ, असे जाहीर आव्हान हिंदु राष्ट्र समन्वय समितीने दिले आहे.
मंगळवार, २३ डिसेंबर रोजी कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत समितीचे तालुका संयोजक श्री. नितीन काकडे बोलत होते. यावेळी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
आसामच्या धर्तीवर संपूर्ण देशात ‘बहुपत्नी विवाहा’वर बंदी घाला! : हिंदु जनजागृती समितीची मागणी
सांता क्लॉज हा बाजारपेठेने निर्माण केलेला भ्रम
नितीन काकडे म्हणाले की, “नाताळ जवळ आला की सांता क्लॉजच्या टोप्या विकणे आणि मुले झोपल्यावर सांता गिफ्ट देऊन जातो, अशा कपोलकल्पित कथा सांगून हिंदु मुलांवर ख्रिस्ती अंधश्रद्धा लादल्या जात आहेत. स्वतःला पुरोगामी म्हणवणारे लोक हिंदू सणांमधील प्रथांना ‘थोतांड’ म्हणतात, मग ते सांताच्या बाबतीत गप्प का? जर सांता क्लॉज खरोखर येतो, तर ते सिद्ध करून दाखवावे.”
ख्रिस्ती धर्मगुरूंचाच सांताला विरोध
पत्रकार परिषदेत ख्रिस्ती धर्मातील विविध पंथांचा संदर्भ देत समितीने दावा केला की:
* इटलीचे बिशप अँटोनियो स्टॅग्लियानो यांच्या मते, सांता क्लॉज हा कोका-कोला कंपनीने जाहिरातीसाठी वापरलेला काल्पनिक चेहरा आहे.
* पाद्री मार्क ड्रीस्कॉल यांनी सांताला ‘ख्रिसमसचा राक्षस’ संबोधले असून, पालकांनी मुलांशी खोटे बोलणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.
* रशिया आणि ग्रीस मधील ‘ऑर्थोडॉक्स चर्च’ सांताची संकल्पना पूर्णपणे नाकारते, तर ‘प्रोटेस्टंट संस्था’ याला मूर्तीपूजा किंवा अंधश्रद्धा मानतात.
‘अंनिस’च्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
“हिंदूंच्या श्रद्धांना विज्ञानाच्या नावाखाली विरोध करणारी ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ (अंनिस) या ख्रिस्ती अंधश्रद्धेबाबत गप्प का आहे?” असा सवालही समितीने उपस्थित केला. सांता क्लॉजमध्ये अंनिसला कोणता विज्ञानवादी दृष्टिकोन दिसतो, हे त्यांनी स्पष्ट करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
ऑनलाईन जुगार थांबवण्यासाठी ‘सुराज्य अभियान’ आक्रमक — केंद्र सरकारकडे राष्ट्रव्यापी कायद्याची मागणी
या पत्रकार परिषदेला श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाचे श्री. पराग फडणीस, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. अशोक गुरव, महाराजा प्रतिष्ठानचे श्री. निरंजन शिंदे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे श्री. संभाजीराव भोकरे यांच्यासह अन्य हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
समितीचे आवाहन: पालकांनी आपल्या मुलांना अशा भ्रामक कथांपासून दूर ठेवून, त्यांच्यावर हिंदु धर्मानुसार संस्कार करावेत आणि मुलांची फसवणूक थांबवू शकता.
