कल्याणमध्ये औदुंबर सोसायटीत रहिवाशांचा भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाविरोधात मनपेकडे आक्रोश
सचिन शिंदे
कल्याण: औदुंबर प्रसाद सोसायटीच्या रहिवाशांनी मागील तीन महिन्यांपासून सोसायटीत घुसलेल्या दोन भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाबाबत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.
रहिवाशांनी पत्रात म्हटले आहे की —
एका पायाने अपंग असलेल्या महिलेवर कुत्र्याने झेप घेतल्याने त्या पडल्या व त्यांना उपचार करावे लागले.
ज्येष्ठ महिला व मुलांना वारंवार कुत्र्यांमुळे भीतीचा सामना करावा लागत आहे.
शिकवणी वर्गाला येणाऱ्या बारा वर्षांपर्यंतच्या मुलांनाही या उपद्रवामुळे धास्ती वाटते.
महानगरपालिकेने कुत्रे पकडण्याचा प्रयत्न केल्यावर काही प्राणीप्रेमींनी (विशेषतः सोसायटीतील रहिवासी व त्यांच्या समर्थक) विरोध करून गाडी परत पाठवली. त्यामुळे प्रश्न सुटण्याऐवजी अधिक गंभीर झाला आहे.
रहिवाशांचे म्हणणे आहे की :
“कुत्र्यांचे लसीकरण झाले असले तरी त्यांची भीती कमी होत नाही.”
“या कुत्र्यांचे कायद्याने रीलोकेशन नसेल तर शेल्टर होममध्ये पुनर्वसन करावे.”
सोसायटीतील नागरिकांनी आयुक्तांकडे मागणी केली आहे की हे भटके कुत्रे तातडीने सोसायटीतून हटवावेत आणि अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई व्हावी.

