गुन्हे-वृत

“आयआयटी बॉम्बेमध्ये प्रवेशाविना २० दिवस राहिला! बिलाल अहमद तेलीवर गंभीर गुन्हे दाखल”

मुंबई: कोणत्याही प्रवेशाशिवाय आयआयटी बॉम्बेमध्ये २० दिवस राहून व्याख्याने ऐकणाऱ्या बिलाल अहमद तेली या तरुणाला मुंबई क्राइम ब्रँचने अटक केली आहे. या प्रकरणाने आयआयटीसारख्या उच्च दर्जाच्या शैक्षणिक संस्थेच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

कल्याणमध्ये शस्त्रसज्ज सराईत गुन्हेगार अटकेत, दोन गावठी पिस्टल व जिवंत काडतूस जप्त

फसवणूक, बनावट कागदपत्र तयार करणे, खोटं व्यक्तिमत्त्व सादर करणे आणि अनधिकृत प्रवेश (ट्रेसपासिंग) अशा गंभीर कलमांखाली बिलालविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २२ वर्षीय बिलालने २१ बनावट ई-मेल आयडी तयार केले होते आणि त्याचा वापर स्वतःला सोशल मीडिया इन्फ्लुएंसर म्हणून सादर करण्यासाठी केला जात होता.

ठाकरे बंधूंच्या संभाव्य एकत्र येण्यावरून महाराष्ट्रात नवा राजकीय श्वास

दिवसा व्याख्यान, रात्री सोफ्यावर झोप

बिलाल दिवसातून आयआयटीच्या विविध वर्गांमध्ये बसायचा आणि रात्री इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या सोफ्यावर झोपायचा. हा प्रकार जवळपास २० दिवस सुरू होता. सुरुवातीला त्याने स्वतःला आयआयटीचा विद्यार्थी असल्याचे सांगून संशय दूर केला होता. मात्र, २१ जून रोजी एका कर्मचाऱ्याने त्याला झोपलेल्या अवस्थेत पाहिले आणि विचारणा केली असता, तो लगेच पळून गेला. यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने तपास सुरू झाला.

 

सीसीटीव्ही फुटेजमधून उलगडला प्रकार

आयआयटी प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर सुरक्षा पथकाने बिलालला तात्काळ ताब्यात घेतले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. तपासादरम्यान, त्याच्याकडे फेक डॉक्युमेंट्स आढळून आले. पोलिसांनी त्याचा मोबाईल तपासण्याचा प्रयत्न केला असता, त्याने आधीच डाटा डिलीट करून ठेवला होता. आता तांत्रिक पद्धतीने तो डेटा परत मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

गोळवली तलाव संकट: झेनिथ रबरविरोधात भाजप उपाध्यक्षांची तातडीची कारवाईची मागणी

देशविरोधी कनेक्शनचीही चौकशी

पोलिस आणि इतर तपास यंत्रणांकडून सध्या हेही पाहिले जात आहे की बिलाल कोणत्याही देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी होता का? त्याच्या परदेश दौऱ्यांची माहितीही बारकाईने तपासली जात आहे.