Thursday, June 18, 2026
Latest:
ठळक बातम्या

3 महिन्यात तयार होणार महाराष्ट्रची ‘स्पेस पॉलिसी’!

कार्यक्षमता आणि पारदर्शक प्रशासनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, उत्तन येथे आज ‘स्पेस टेक फॉर गुड गव्हर्नन्स कॉनक्लेव्ह’ कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

फिक्की स्मार्ट पोलिसिंग पुरस्कार 2024’ने पोलिसांच्या उपक्रमांचा सन्मान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, स्पेस टेक आपल्या जीवनाचे अभिन्न अंग होत आहे. यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पेस पॉलिसी तयार करून जगाच्या स्पेस तंत्रज्ञानाचे 8-10% भागीदार होऊन या क्षेत्रात 44 बिलियन डॉलर्सच्या व्यवसायाचे लक्ष्य ठेवले.

गडचिरोली पोलीस दलाचे अभिनंदन! ‘प्रोजेक्ट उडान’ उपक्रम ‘फिक्की स्मार्ट पोलिसिंग पुरस्कार 2024’ने सन्मानित

परिणामी 2014 मध्ये केवळ 1 स्पेस टेक स्टार्टअप होता तेथे आज 124 मिलियन डॉलर्सच्या गुंतवणुकीसह 189 स्पेस स्टार्टअप्स काम करत आहेत.

पु. ल. देशपांडे यांनी महाराष्ट्राचा हॅपीनेस इंडेक्स तयार केला – मुख्यमंत्री फडणवीस

स्पेस टेकमुळे रिमोट सेन्सिंग, ड्रोन तंत्रज्ञान आणि जीपीएसचा उत्तम वापर करून प्रशासनात कार्यक्षमता, उत्तरदायित्व आणि पारदर्शकता येत असल्याचे नमूद करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, वर्षानुवर्षे लागणाऱ्या विविध प्रकल्पांची निर्मिती स्पेस टेकमुळे गतीशक्ती प्लॅटफॉर्मअंतर्गत नियोजित वेळेत आणि नियंत्रित खर्चात दर्जेदार पद्धतीने होत आहे, यामुळे पीक विमा क्षेत्रात ₹2500 कोटींची बचत होणार आहे.

मुंबई महापालिकेच्या ₹2 लाख कोटींच्या प्रकल्पांचा आढावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, स्पेस टेकच्या साहाय्याने जलयुक्त शिवारसारख्या योजनेच्या माध्यमातून 20,000 गावांमध्ये वॉटर बजेटिंग करून त्यांना दुष्काळमुक्त करता आले, असे सांगत शेतीशी निगडीत तंटे मिटवण्यासाठी स्पेस टेकचा उपयोग व योग्य नकाशे तयार करण्याची क्षमता अधोरेखित केली.

राज्यात १४ खाणी सुरू करून महसूल वाढवण्यावर भर देणार – मुख्यमंत्री फडणवीस

तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी ‘स्पेस टेक फॉर गुड गव्हर्नन्स कॉनक्लेव्ह’मधून येणार्‍या सूचनांवर विचार करून सरकार यावर काम करत असून येत्या 3 महिन्यात महाराष्ट्राची स्पेस पॉलिसी तयार करण्याचे आश्वस्त केले.

सुप्रशासन असेल तेथे गुंतवणूक वाढते, महाराष्ट्रात गुंतवणूक वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत – मुख्यमंत्री फडणवीस

यावेळी लेफ्टनंट जनरल विनोद जी. खंदारे, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.