महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शनाच्या माध्यमातून अध्यात्मप्रसार
मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील हजारो जिज्ञासूंनी दिली सनातनच्या ग्रंथप्रदर्शनांना भेट !
*ठाणे* – प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही सनातन संस्थेच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शनाच्या माध्यमातून अध्यात्मप्रसार करण्यात आला. मुंबई, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांत महाशिवरात्रीच्या निमित्ताने भगवान शंकराच्या मंदिराच्या परिसरात सनातन संस्थेच्या वतीने ठिकठिकाणी ग्रंथप्रदर्शने लावण्यात आली होती. या सर्व प हजारो जिज्ञासूंनी भेट देऊन सनातनचे विविधांगी ग्रंथ आणि सनातनची सात्त्विक उत्पादने घेतली.
एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
‘महाशिवरात्री’ला शिवतत्त्व नेहमीच्या तुलनेत १ हजार पटीने कार्यरत असते. या दिवशी शिवाची उपासना जेवढी अधिक करू, तेवढा उपासकाला आध्यात्मिक स्तरावर अधिक लाभ होतो. या अनुषंगाने शिवाच्या उपासनेसह विविध विषयांवर भाविकांना शास्त्रीय माहिती या ग्रंथप्रदर्शनांवर देण्यात आली.
मराठी माणूस आपल्या विचारांनी पुन्हा दिल्ली जिंकणार – मुख्यमंत्री फडणवीस
या सर्व ग्रंथप्रदर्शनांना भेट देणारे विविध मान्यवर जिज्ञासू आणि भाविक यांनी सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेले अध्यात्म, साधना, देवतांची उपासना, धर्माचरण, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती, आपत्काळविषयीची सिद्धता आयुर्वेद, आरोग्य आदी विषयांवरील ग्रंथमालिकेतील ग्रंथ आणि सात्विक उत्पादने यांचा लाभ घेतला.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे 12 किल्ले लवकरच जागतिक वारसा केंद्र होणार
ग्रंथप्रदर्शनांला शिवसेना शिंदे गट चे कल्याण ग्रामीण प्रमुख आणि माजी नगरसेवक महेश पाटील यानि डोंबिवली येथील नामदेव पाटीलवाडी भागातील सनातन संस्थेच्या ग्रंथ प्रदर्शनाला सदिच्छा भेट दिली.
महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासूनच शिवाच्या उपासनेचे शास्त्र जिज्ञासूंना कळावे यासाठी फलक प्रसिध्दी, सोशल मिडीया आदी माध्यमातूनही सनातन संस्थेच्या वतीने लोकांचे प्रबोधन करण्यात आले.
कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी सहा जणांना जामीन मंजूर!
ठाणे येथे १६ ठिकाणी, दिवा येथे १ ठिकाणी, डोंबिवली येथे ९ ठिकाणी, कल्याण आणि बदलापूर येथे प्रत्येकी २ ठिकाणी, मुरबाड अन अंबरनाथ येथे प्रत्येकी १ ठिकाणी, असे ग्रंथप्रदर्शन अन विक्री केंद्र उभारण्यात आले होते.