ठळक बातम्या

कल्याणच्या होटेल गुरूदेव ग्रान्ड च्या कर्मचा-याचा आत्महत्येचा प्रयत्न

महापालिकेच्या बाईरूक्मिणी बाई रूग्णालयात उपचार मिळेना
कल्याण- कल्याण-डोबिवली महापालिकेच्या रुक्मिणी बाई रूग्णालयात उपचारा अभावी नेहमीप्रमाणे एका रूग्णाला कळवा येथील शासकीय रूग्णालयात पाठविण्याची वेळ आली . जवळ पास एक तास रूग्ण वेदनेने तडफत होता.

रवि तुरी नावाच्या हा व्यक्ति कल्याणच्या प्रसिद्ध होटेल गुरूदेव ग्रान्ड मध्ये रूम कीपर म्हणून कामाला होता. कामगारांना दिलेल्या खोलीत तो अन्य कामगारां सोबत राहत होता. शनिवारी संध्याकाळी रवि ह्यानी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

सोबत राहणा-या अन्य कामगारांनी त्याला ताबडतोड बाईरूक्मिणी बाई रूग्णालयात आणला . पण एक तासा पेक्षा जास्त वेळ निघून गेल्यानंतर ही रवि ला योग्य उपचार मिळाला नाहीं. त्याच वेळी शिवसेनेचे (उबाठा ) विधानसभा सह संघटक रूपेश चंद्रकांत भोईर तिथे पोहचले आणि त्यांनी मुख्य वैद्यकीय अधिकारी यांना फोन करून हकीकत सांगितली.

त्यानंतर रूग्णालयाच्या चिकित्सक जागे झाले आणि आमच्या इथे अति दक्षता विभाग बंद असल्यामुळे आम्ही रूग्णाला कळवा येथील शासकीय रूग्णालयात पाठविण्याची व्यवस्था करीत आहोत. असे म्हणाले. तो पर्यंत रूग्ण तडफडतच होता. रूपेश भोईर यांनी रूग्णाच्या सोबत आलेल्या होटलचे प्रबंधक संदीप चौधरी बरोबर बोलून रुग्णवाहिका ची व्यवस्था केली आणि रूग्णाला कळवा येथील शासकीय रूग्णालयात पाठविले.

ह्या बाबतीत बोलताना रूपेश भोईर यांनी सांगितले की मी माझी तब्येत बरी नसल्यामुळे बाईरूक्मिणी बाई रूग्णालयात औषध घ्यायला आलो असता मला ओपीडी मधून रूग्णाच्या वेदनेने तडफण्याचा आवाज ऐकू आला . मी ओपीडी मध्ये गेलो असता मला एक बेडवर एक युवक वेदनेने तडफत असताना दिसला.

काही खाजगी लोक त्याला सांभाळत होते. पण रूग्णालयाचा एक ही कर्मचारी त्या युवकाकडे बघत सुद्धा नव्हता. मी मुख्य वैद्यकीय अधिकारी यांना फोन केल्यावर रूग्णालयाच्या स्टाफ जागृत झाला आणि रुग्णवाहिकेची व्यवस्था करतोय असे म्हणू लागला. रूपेश भोईर यांनी बाईरूक्मिणी बाई रूग्णालयाची व्यवस्थेवर पुनः एकदा प्रश्न चिन्ह उभा केला आहे.