कल्याण: शिवसेना उद्धव गटात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महिला
कल्याण- पक्षाचे उमेदवारी जाहिर झालय नंतर आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात रविवारी शिवसेनेचे (UBT) विधानसभा सहसंघटक रुपेश चंद्रकांत भोईर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि काँग्रेसच्या महिलांनी शिवसेनेत (उद्धव गट) प्रवेश करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
या विरोधी पक्षांच्या महिलांनी रविवारी कल्याणमधील गीता सभागृहात आयोजित कार्यकर्ता मेळावेत प्रवेश केला.
यावेळी कल्याण पश्र्चीमतले अधिकृत घोषित उमेदवार सचिन बासरे, शिवसेना विधानसभा सहसंघटक रुपेश चंद्रकांत भोईर यांच्यासह, महिला आघाडी शहर संघटक सुनीता धारगळकर, महिला संघटक रंजना रवींद्र सांगळे, रुपाली भोईर, उपजिल्हाप्रमुख विजय काटकर, जिल्हा सचिव जयेश वाणी, तुषार राजे, उपशहरप्रमुख बाळा परब, बंडर कारभारी, विभाग प्रमुख अरुण बागवे, शाखाप्रमुख सादिक शेख यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.
नदीम शेख, सतीश धोत्रे, अमीर खान यांच्या विशेष प्रयत्नाने पक्षात प्रवेश केलेल्या महिलांमध्ये शबनम शेख, राणी गुप्ता, स्नेहा धनगर, झाकिया शेख आदींसह शेकडो महिलांची उपस्थितीती होती.