सामाजिक

कल्याण डोंबिवली मध्ये 17962 किलो निर्माल्य गोळा

‘निर्मल यूथ फाउंडेशन’ या डोंबिवलीतल्या संस्थेच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही दिनांक ०८, ११, १२ व १७ सप्टेंबर २०२४ या तारखांना गणेश विसर्जनाच्या दरम्यान सुमारे १७९६२ किलो एव्हढे निर्माल्य व 8637 किलो इतर घन कचरा डोंबिवलीतल्या सर्व विसर्जन केंद्रांवरून गोळा करून शासनाच्या ताब्यात दिला आहे.

निर्मल यूथ फाउंडेशन’ चे अध्यक्षा अक्षता औटी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अधिकारी तसेच अन्य कर्मचारी व पर्यावरण दक्षता मंडळ यांचा पुढाकार घेऊन केलं गेल.

हे कार्य करण्यामागचे उद्दिष्ट नैसर्गिक जलस्त्रोत स्वच्छ ठेवण्याचा व कचरा व्यवस्थापन असून असे पर्यावरणपूरक कार्यक्रम राबवण्याचे कार्य संस्थे तर्फे २०१६ सालापासून चालू आहे.

या कामी डोंबिवलीतील राष्ट्रीय सेवा योजना NSS unit of The SIA College आणि NSS unit of प्रगती कॉलेज या विद्यार्थ्यांचा सहभागही उत्साहपूर्ण दिसून आला. संस्थेचे सदस्य प्रिया गुप्ता, प्रीती गुप्ता, विराज थोरात, चैतन्य लोके, स्नेहा तलावडेकर, शैलेंद्र साठे यांनी सुमारे ७ नैसर्गिक घाट आणि ५ कृत्रिम तळ्यांवर अतिशय उत्कृष्ट पद्धतीचे प्रतिनिधित्व करून समन्वय साधला.

याबद्दल सर्वांचे कौतुक होत आहे. तसेच पर्यावरण पूरक सण साजरा करण्यासाठी सर्व भक्तांना आवाहन करण्यात आले.