महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांची विजयी सभा संपन्न
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाच्या आंदोलनाची दखल घेत मा.उर्जामंत्री यांनी नुकतीच वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांना 19% वेतन वाढ एप्रिल 2024 पासून लागू करण्या बाबत घोषणा केली.
या निमित्ताने शासन व वीज कंपनी प्रशासन यांचे आभार व्यक्त करण्यासाठी संघटनेने सर्व जिल्ह्यातील कार्यालया समोर विजयी गेट मिटींग चे आयोजन केले होते
पुण्यातील रास्ता पेठ कार्यालय समोर महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांची गेटमिटींग होवून या मध्ये वेतनवाढी बाबत मा.उर्जामंत्री देवेंद्रजी फडणवीस, भाजपा प्रदेश अध्यक्ष मा.मा.चंद्रशेखर बावनकुळे अपर प्रधान सचिव ऊर्जा मा.आभा शुक्ला व तिन्ही वीज कंपनीच्या वरिष्ठ प्रशासकिय अधिकारी यांचे कामगारांनी आभार मानले.
हरियाना पॅटर्न नुसार वीज ऊद्योग कंत्राटदार मुक्त रोजगार करण्याचा शासनाने लवकरच निर्णय घ्यावा अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष नीलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी केली.
या वेळी भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा अध्यक्ष श्री अर्जुन चव्हाण, अभय वर्तक, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष निलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे, उपमहामंत्री राहूल बोडके, उमेश आणेराव , कोषाध्यक्ष सागर पवार, संघटन मंत्री ऊमेश आणेराव, पुणे झोन सचिव निखील टेकवडे, चंद्रकांत नागरगोजे, योगेश महांगरे, दिपक सुतार, मार्गदीप मस्के श्रीमती रजनी काची, संगीता शेलार, कीरण हंचाटे आदी पदाधिकारी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य वीज मंडळ सुत्रधारी कंपनीच्या स्वतंत्र संचालिका मा. नीता केळकर या आज महावितरण प्रकाशभवन प्रादेशिक कार्यालय पुणे येथे आल्या असता शिष्टमंडळाने पुण्याचे मुख्य अभियंता मा. राजेंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीत त्यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन शासन व वीज कंपनी चे आभार मानले.