भारतीय मजदूर संघाचे जेष्ठ नेते डाॅ सुधाकर कुलकर्णी यांचे दुःखद निधन
डॉक्टर सुधाकर कुलकर्णी भारतीय मजदूर संघाचे ज्येष्ठ नेते , प्रचारक यांचे दि 6 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी भोपाळ येथे दुःखद निधन झाले. गेली पन्नास वर्षे भारतीय मजदूर संघाच्या कामांमध्ये त्यांनी आपले योगदान दिले.
आयुर्वेदिक डॉक्टर असलेले डॉ. कुलकर्णी हे मूळचे नागपूरचे. त्यांचा मध्य प्रदेश मध्ये स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय होता. ते संघाचे स्वयंसेवक होते. श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी यांच्या आग्रहाने त्यांनी आपला व्यवसाय बंद करून भारतीय मजदूरं संघांचे पूर्ण वेळ काम सुरू केले. आयुष्यभर अविवाहित राहून संघ प्रचारक म्हणून त्यांनी काम केलं.
महाराष्ट्र ,मध्य प्रदेश आदी ठिकाणी काम केल्यानंतर त्यांना आसाम आणि ईशान्य भारतातील सात राज्यांची जबाबदारी देण्यात आले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी मजदूर संघाचं काम त्या ठिकाणी सुरू केलं. कुठलाही सोयी सुविधा नाही, वाहतुकीचे साधन नाही, निवास जेवण कुठल्या व्यवस्था नाही अशा परिस्थितीमध्ये त्यांनी कामाला सुरुवात केली.
सुमारे पंधरा वर्षे त्यांनी त्या भागात काम केले. त्यांच्या प्रयत्नातून चहा , काॅफी मळ्यातील असंघीटत मजदूर, अंगणवाडी , घरेलु कामगार, आणि अन्य क्षेत्रात मणिपूर , असाम, मेघालय या ठिकाणी काम सुरू झाले. त्यानंतर त्यांच्याकडे महाराष्ट्र, विदर्भ, गोवा अशी क्षेत्र प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली. येथेही त्यांनी चांगलं काम केलं.
शांत आणि प्रेमळ स्वभावाचे डॉक्टर सुधाकर कुलकर्णी संघाचे एकनिष्ठ समर्पित कार्यकर्ता होते. सर्वस्व वाहून देऊन भारतीय मजदूर संघा चे काम अनेक कार्यकर्त्यांनी केले सर्वदूर वाढवले.
त्यात डॉक्टर कुलकर्णी यांचे नाव देखील अग्रस्थानी राहील गेल्या अनेक दिवस ते भोपाळ मध्ये होते, आजारी होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. आपला एक ज्येष्ठ सहकारी आपल्याला सोडून गेला अशी भावना महाराष्ट्र, पुर्वांचलातील हजारो कार्यकर्ते ची झाली आहे.