ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी कृती समितीतर्फे ठाण्यात काम बंद आंदोलन
ठाणे दि.०६ :- राज्याच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी कृती समितीने ठाणे येथे आज काम बंद आंदोलन केले. सुमारे दोन तास हे आंदोलन सुरु होते. आंदोलकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊनत्यांना निवेदन दिले.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत शासकीय रुग्णालयात भरती झालेल्या कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांना भरतीमध्ये ५० टक्के आरक्षण मिळावे, समान काम समान वेतन मिळावे या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.