बांधकाम पाडकाम राडारोडा वाहतूक नियम उल्लंघन प्रकरणी महापालिकेची कारवाई – ४ लाख ७१ हजारांहून अधिक दंड वसूल
मुंबई दि.०६ :- बांधकाम पाडकामाचा राडारोडा वाहतूक करताना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांत ३ ते नोव्हेंबर या कालावधीत एकूण ४ लाख ७१ हजार ६९२ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
या पुढेही दंडात्मक कारवाई सुरू राहणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील वायू प्रदूषण व त्यातही प्रामुख्याने धूळ नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने उपाययोजना राबविण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला केली होती.
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंना ‘मनसे’चा घेराव – सिनेट निवडणुकीसाठी नव्याने
बांधकाम साहित्य वाहून नेणारी सर्व वाहने पूर्णपणे झाकलेली असावीत (वरच्या बाजूने आणि सर्व बाजूंनीसुद्धा), वाहनातून मर्यादेपेक्षा अधिक वजनाचे साहित्य वाहून नेऊ नये, राडारोडा उतरविल्यानंतर वाहन पूर्णपणे धुऊन स्वच्छ करावे आदी सूचना करण्यात आल्या आहेत.