विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचा स्थापना दिवस राजभवन येथे साजरा
मुंबई दि.०१ :- विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशांचा स्थापना दिवस आज राजभवन येथे साजरा करण्यात आला. राज्यपाल रमेश बैस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हरियाणा, कर्नाटक, केरळ, पंजाब व तामिळनाडू या राज्यांचा, तसेच अंदमान व निकोबार, चंदीगड, दिल्ली, लक्षद्वीप व पुडुचेरी या केंद्रशासित प्रदेशांचा स्थापना दिवस समारंभपूर्वक साजरा करण्यात आला.
नम्रता आणि संयम हेच नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमा अंतर्गत विविध राज्यांचे स्थापना दिवस साजरे करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचनेला अनुसरून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ संगीतकार अनू मलिक, राज्यपालांचे विशेष सचिव विपीन कुमार सक्सेना आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमामुळे विविध राज्यांची व केंद्रशासित प्रदेशांची लोकसंस्कृती, लोक संगीत व लोककला याबाबत माहिती मिळते, असे राज्यपाल बैस यांनी यावेळी सांगितले.
सरदार वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी यांना अभिवादन
आद्य शंकराचार्यांनी देशाच्या चार दिशांना चार धर्मपीठे स्थापन करुन देशाला सांस्कृतिक एकात्मतेने जोडले. आज काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत संपूर्ण देश एकात्म भावनेने जोडला गेला आहे, याचे श्रेय आद्य शंकराचार्य यांच्या द्रष्टेपणाला जाते, असेही राज्यपाल बैस म्हणाले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ तसेच एसएनडीटी महिला विद्यापीठातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी विविध राज्यांची लोकगीते आणि नृत्ये यावेळी सादर केली.