सर्वपक्षीय बैठकीला राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनाही बोलवायला हवे होते – बाळा नांदगावकर
मुंबई दि.०१ :- मराठा आरक्षणाच्या विषयावर मंथन व्हायचं असेल तर सर्वपक्षीय सहकार्याची गरज होती, सरकारने बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनाही बोलवायला हवे होतं, त्यांनीही आपले मत व्यक्त केले असते, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आज सांगितले.
नम्रता आणि संयम हेच नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन
प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी नांदगावकर बोलत होते. राज्याचे प्रमुख बैठक बोलवतात तेव्हा प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांना बोलवायला पाहिजे. आमदार जरी असले तरी पक्षप्रमुखांनी त्यांची भूमिका मांडली असती मात्र तुम्ही बोलवलंच नाही. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चार दिवसांचे विशेष अधिवेशन घ्यावे, अशी मागणीही नांदगावकर यांनी केली. जरांगे यांनी उपोषण सोडले पाहिजे असे सर्वांना वाटते. मात्र हा मुद्दा सामोपचाराने सोडवायला हवा असेही नांदगावकर म्हणाले.