मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळेत बदल, १ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी
मुंबई दि.२९ :- मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळेत बदल करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. येत्या १ नोव्हेंबरपासून हा बदल लागू होणार असून सुमारे ३० हजारांहून अधिक रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळेत बदल करण्यात येणार आहे.
शिवाजी उद्यान परिसरातील ‘धुळ’फेक थांबविण्याची स्थानिक रहिवांची मागणी
मुंबईतील लोकलमधील गर्दी, गर्दीमुळे होणारे अपघाती मृत्यू टाळण्यासाठीचा धोरणात्मक उपाय म्हणून मध्य रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
सध्या रेल्वे कर्मचाऱ्यांची कार्यालयीन वेळ सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.४५ अशी आहे. १ नोव्हेंबरपासून कर्मचाऱ्यांना जुन्या वेळेसह सकाळी ११.३० ते संध्याकाळी ७.४५ हा नवा पर्याय देण्यात आला आहे. दोन्हीपैकी एका वेळेची निवड कर्मचाऱ्यांना करता येणार आहे.
पर्यावरण नियमांचे उलंघन केल्याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून माहुल येथील उद्योगांना नोटीस
ही निवड एक महिन्यासाठी असून वेळ निवडल्यावर महिना पूर्ण होण्याआधी वेळेत बदल करता येणार नाही. महिना पूर्ण झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना पुन्हा वेळ बदलण्याची संधी देण्यात येणार आहे. रेल्वेच्या मुंबई विभागातील कार्यालयीन वेळेतील बदल प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे.