बांधकाम मजुरांसाठीची माध्यान्ह भोजन योजना येत्या १ नोव्हेंबरपासून बंद करण्याचे आदेश
मुंबई दि.२७ :- बांधकाम मजुरांना दोन वेळचे भोजन देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेली माध्यान्ह भोजन योजना अखेर बंद करण्यात आली आहे. राज्याच्या कामगार विभागाने संबंधित ठेकेदारांना येत्या १ नोव्हेंबरपासून काम थांबविण्याचे आदेश दिले आहेत. अनेक जिल्ह्यांत कामागारांची संख्या कमी असताना केवळ कागदोपत्री कामगार दाखवून कोटय़वधी रुपये उकळल्याचे समोर आले.
ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो ५’ मार्गिकेतील पहिल्या टप्प्यातील सहा स्थानकांच्या स्लॅबचे काम पूर्ण
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात याचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर कामगारमंत्री सुरेश खाडे यांनी कामगार आयुक्तांमार्फत चौकशीची घोषणा केली. योजनेच्या अंमलबजावणीत वित्तीय आणि प्रशासकीय अनियमितता झाल्याचे या चौकशीत आढळून आले आहे. योजनेबाबत अद्यापही अनेक तक्रारी येत असल्याचे समोर आल्यानंतर योजनाच गुंडाळण्यात आली आहे.
गिरगाव येथील अभ्यासिकेचे उदघाटन
इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाला उपकाराच्या माध्यमातून हजारो कोटींचा निधी मिळतो. हा निधी मजुरांच्या कल्याणासाठी खर्च करणे अपेक्षित असते. याचा भाग म्हणून कामगारांना दोन वेळचे सकस भोजन देणारी योजना राबविण्याचा निर्णय फेब्रुवारी २०१९ मध्ये घेण्यात आला. चपाती, भाजी, डाळ, भात, लोणचे, सलाड आणि गूळ अशी थाळी एक रुपयात देणारी ही योजना होती.