दहावीचा निकाल कमी लागलेल्या महापालिका शाळांच्या मुख्याध्यापकांना नोटीस
मुंबई दि.२३ :- मार्च २०२३ च्या दहावीच्या परीक्षेत बृहन्मुंबई महापालिकेच्या ज्या शाळांचा निकाल ८५ टक्क्यांपेक्षा कमी लागला अशा ८८ शाळांच्या मुख्याध्यापकांना महापालिकेच्या शिक्षण विभागाने नोटीस पाठवली आहे. बृहन्मुंबई महापालिकेच्या एकूण २४९ माध्यमिक शाळा मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आहेत.
मुंबईत उद्या शिवसेना आणि उबाठा गटाचा दसरा मेळावा – दोन्ही गटांकडून शक्ती प्रदर्शनाची जोरदार तयारी
या शाळांचा यंदाचा दहावीचा निकाल गेल्यावर्षीपेक्षा वाईट लागला. गेल्यावर्षी ९७ टक्के तर यंदा केवळ ८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. त्यामुळे मार्च २०२४ मध्ये चांगला निकाल लागावा यासाठी शाळांच्या कामगिरीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही नोटीस बजाविण्यात आली आहे.