ठळक बातम्या

जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासाठी येत्या १४ डिसेंबरपासून बेमुदत संप

कर्मचारी संघटना समन्वय समितीचा इशारा

मुंबई दि.२३ :- राज्य शासनाने आश्वासन देऊनही गेल्या सहा महिन्यांत जुनी निवृत्ती वेतन योजना पुन्हा लागू करण्याबाबत काहीच हालचाल झाली नाही. ही मागणी धसास लावण्यासाठी येत्या १४ डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व नगरपालिका कर्मचारी संघटना समन्वय समितीने दिला आहे.

मुंबईत उद्या शिवसेना आणि उबाठा गटाचा दसरा मेळावा – दोन्ही गटांकडून शक्ती प्रदर्शनाची जोरदार तयारी

बेमुदत संपावर जाण्याआधी राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा देण्यासाठी ८ नोव्हेंबरला जिल्हा, तालुकास्तरावर कर्मचाऱ्यांचे सहकुटुंब मोर्चे काढण्यात येणार आहेत.

आमदार अपात्रता प्रकरण; ३४ याचिकांची सहा गटांमध्ये विभागणी करून पुढील सुनावणी २६ ऑक्टोबरला

कर्मचाऱ्यांच्या संघटन समन्वय समितीच्या झालेल्या बैठकीत हा इशारा देण्यात आला. राज्यातील १७ लाख सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व नगरपालिका कर्मचारी या बेमुदत संपात सहभागी होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *