हातगाड्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बॅटरीवरील ढकलगाडीच्या पर्यायाची चाचपणी
पालकमंत्री दिपक केसरकर यांची माहिती
मुंबई दि.१९ :- मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट, झव्हेरी बाजार येथील लहान-मोठ्या रस्त्यांवर हातगाड्यांऐवजी बॅटरीवर चालणाऱ्या ढकलगाडी देता येतील का याची चाचपणी सुरू आहे, अशी माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. ‘आयआयटी’सारख्या संस्थेचीही यासाठी मदत घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठा आरक्षण आंदोलनातील कार्यकर्ते सुनील कावळे यांची मुंबईत आत्महत्या
बृहन्मुंबई महापालिका मुख्यालयात प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी केसरकर बोलत होते. मुंबादेवी मंदिर, काळबादेवी, क्रॉफर्ड मार्केट, झवेरी बाजार आदी परिसरात दिवसभर मोठ्या प्रमाणात हातगाड्यांवरून सामानाची ने -आण सुरू असते.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर हिंदी वेबसीरिज ‘वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स’
अवजड सामान लादलेल्या हातगाड्या ओढताना कामगारांना होणारे श्रम आणि हातगाड्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी बॅटरीवर चालणाऱ्या ढकलगाडीच्या पर्यायाचा विचार सुरू असल्याचे केसरकर म्हणाले.