राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने डोंबिवलीत विधि महाविद्यालय सुरू
डोंबिवली दि.१९ :- राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या पुढाकाराने डोंबिवलीत कायद्याचे शिक्षण देणारे विधि महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. संस्थेच्या डोंबिवली पूर्व येथील स्वामी विवेकानंद शाळेच्या (दत्तनगर शाखा) इमारतीत हे महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची क्षमता ६० इतकी आहे.
हातगाड्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बॅटरीवरील ढकलगाडीच्या पर्यायाची चाचपणी
महाविद्यालयाचे उदघाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डाॅ. रवींद्र कुलकर्णी, संस्थेचे अध्यक्ष संजय कुलकर्णी, कार्यवाह शिरीष फडके यांच्या उपस्थितीत झाले.
मराठा आरक्षण आंदोलनातील कार्यकर्ते सुनील कावळे यांची मुंबईत आत्महत्या
महाराष्ट्र शासन, भारतीय विधिज्ञ परिषद यांच्या मान्यतेने विधी महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. हे महाविद्यालय मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डाॅ. अनुजा पळसुलेदेसाई यांनी केले.