* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> मराठा आरक्षण आंदोलनातील कार्यकर्ते सुनील कावळे यांची मुंबईत आत्महत्या – मुंबई आसपास मराठी
Wednesday, February 21, 2024
Latest:
ठळक बातम्या

मराठा आरक्षण आंदोलनातील कार्यकर्ते सुनील कावळे यांची मुंबईत आत्महत्या

मुंबई दि.१९ :- मराठा आरक्षण आंदोलनातील सक्रिय कार्यकर्ते सुनील कावळे यांनी मुंबईत आत्महत्या केली, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी ‘एक्स’ (ट्विटर) या समाजमाध्यमाद्वारे दिली.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर हिंदी वेबसीरिज ‘वीर सावरकर, सिक्रेट फाइल्स’

मराठा बांधवांनो, आपल्या मागण्या मंजूर करून घेण्याचा हा योग्य मार्ग नाही. काळाच्या छाताडावर बसून अनेक संग्राम आपल्या लढवय्या जातीने इतिहासात जिंकले आहेत. खचून जाऊ नका. लढाई अर्ध्यावर टाकून तर जाऊच नका, असेही पाटील यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

मुख्यमंत्री शिंदे गटातील माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचा उद्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मराठा आरक्षण हा विषय आमच्या जगण्याशी संबंधित आहे, हे आता तरी मान्य करा. एवढे बळी गेल्यावरही तुम्हाला जाग येत नाही. यापेक्षा मराठा युवकांच्या आत्महत्या होऊ नये, यासाठी सरकारने तात्काळ पाऊले उचलावी. नाहीतर उद्रेक अटळ आहे, असा इशाराही देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *