महाराष्ट्रातील कौशल्य केंद्रे स्थानिक तरुणांना जागतिक स्तरावरील रोजगार देतील- पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली, दि. १९
महाराष्ट्रातील कौशल्य केंद्रे स्थानिक युवा वर्गाला जागतिक स्तरावरचे रोजगार देतील आणि त्यांना बांधकाम क्षेत्र, आधुनिक शेती, प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रांमध्ये कुशल बनवतील, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ५११ प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रांचे उदघाटन झाले. त्यावेळी पंतप्रधान मोदी बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील युवकांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्राच्या ग्रामीण जिल्ह्यांमध्ये प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांमध्ये विविध क्षेत्रांतील कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.
—–