बाळासाहेब आपला दवाखाना’ वर्षपूर्तीच्या निमित्ताने जनजागृतीपर गीताच्या ध्वनिफितीचे प्रकाशन
मुंबई दि.१७ :- बाळासाहेब ठाकरे प्राथमिक आरोग्य सेवा सक्षमीकरण योजनेच्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून आपला दवाखान्यांबाबत रचलेल्या जनजागृतीपर गीताच्या ध्वनिफीतीचे प्रकाशन मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते काल झाले. आपला दवाखान्यांच्या ठिकाणी अभिप्राय पेटी ठेवण्यात येईल. नागरिकांनी या सेवेबाबतचे अभिप्राय, सूचना कळवाव्यात, असे आवाहन लोढा यांनी केले.
आदिवासी विकास विभागाच्या ७३ आश्रम शाळा स्मार्ट होणार
अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे, बृहन्मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी श्रीमती दक्षा शहा आदी यावेळी उपस्थित होते.
‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ अंमलबजावणीचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आढावा
आपला दवाखान्यांची संख्या १९४ पर्यंत पोहोचली असून मुंबईकर नागरिकांच्या आरोग्य सेवेत ऑक्टोबर महिन्यात आणखी ७ आपला दवाखान्यांची भर पडणार आहे. ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत १३ पैकी ६ दवाखाने सुरू झाले आहेत. आतापर्यंत २३ लाख नागरिकांना आपला दवाखान्याच्या माध्यमातून आरोग्याच्या विविध सुविधांचा लाभ घेतला आहे, अशी माहिती लोढा यांनी दिली.