आदिवासी विकास विभागाच्या ७३ आश्रम शाळा स्मार्ट होणार
मुंबई दि.१७ :- राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या ३० प्रकल्प कार्यालयाच्या अखत्यारितील ४९७ आश्रमशाळांपैकी ७३ शाळा स्मार्ट करण्यात येणार आहेत. यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेऊन इतरांसाठी आदर्शवत होतील, अशा शाळांची उभारणी करण्याची सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुख्यमंत्री शिंदे ‘वर्षा’ निवासस्थानी काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी ही माहिती दिली.
‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ अंमलबजावणीचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आढावा
मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह विविध शासकीय विभागांचे सचिव या बैठकीला उपस्थित होते. सर्व आधुनिक सुविधांयुक्त ग्रामपंचायत कार्यालयांच्या उभारणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात ७३ ग्रामपंचायत कार्यालयांची उभारणी करण्यात येणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय लवकरच जारी करण्यात येणार असून विभागाने प्राधान्याने ग्रामसचिवालयांची कामे पूर्ण करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन
राज्यात ७३ ठिकाणी अपंगांसाठी पुनर्वसन केंद्र सुरु करण्यात येणार असून यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. राज्यातील मंदिरांच्या विकासासाठी ७३ मंदिरे निश्चित करण्यात आली असून तांत्रिक मान्यतेची कार्यवाही सुरु आहे. जिल्हा विकास योजना, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि राज्य अर्थसंकल्पातून या मंदीर विकासाचा खर्च करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.