गोविंदवाडी बायपास रस्ता दुपारी चार ते रात्री एकपर्यंत बंद; नवरात्रोत्सवानिमित्त वाहतुकीत बदल
मुंबई दि.१६ :- कल्याण पश्चिमेकडील दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे. येथे होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन वाहतूक विभागाकडून दुपारी ४ ते रात्री १ वाजेपर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.
वसई, विरारमध्ये ‘महारेल’तर्फे ४ रेल्वे उड्डाणपूल
येत्या २४ ऑक्टोबरपर्यंत हा बदल करण्यात आला आहे. लालचौकीकडून दुर्गाडी चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. या वाहनांना लालचौकी आधारवाडी चौकातून पडघामार्गे बाहेर पडावे लागेल.
मुंबई शहर आणि उपनगरात पुढील दोन दिवस तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता
भिवंडीकडून येणाऱ्या वाहनांना आधारवाडी चौकातून मुरबाड महामार्गाने इच्छितस्थळी जाता येईल. गोविंदवाडी मार्गाने येणाऱ्या वाहनांना संध्याकाळी ४ ते रात्री १२ वाजेपर्यंत प्रवेश बंद करण्यात आला आहे. अवजड वाहनांना या काळात केवळ रात्री १ ते सकाळी ६ वाजेपर्यंत गोविंदवाडी बायपासमार्गे प्रवास करता येणार आहे.