दिवाळी, छटपूजेच्या निमित्ताने मध्य रेल्वेवर २४ विशेष वातानुकूलित रेल्वेगाड्या
मुंबई दि.१६ :- दिवाळी, छटपूजेच्या निमित्ताने मध्य रेल्वेवर २४ विशेष वातानुकूलित रेल्वेगाड्या चालविण्यात येणार आहेत. ०२१३९ अतिजलद विशेष रेल्वेगाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर दरम्यान १९ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत चालविण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सोमवारी आणि गुरुवारी रात्री १२.२० वाजता ही गाडी सुटेल आणि दुपारी ३.३० वाजता नागपूर येथे पोहोचेल. ०२१४० ही अतिजलद विशेष रेल्वेगाडी २१ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर या कालावधीत मंगळवारी आणि शनिवारी दुपारी १.३० वाजता नागपूर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.१० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.
करोना केंद्र गैरव्यवहार प्रकरणी आयकर विभागाचे मुंबई, पुण्यात छापे; करार व्यवहारांची छाननी
या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबा देण्यात आला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगळुरू ही साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी (गाडी क्रमांक ०११८५) रेल्वेगाडी २० ऑक्टोबर ते १ डिसेंबर दरम्यान चालविण्यात येणार आहे. दर शुक्रवारी रात्री १०.१५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ५.०५ वाजता मंगळुरू येथे पोहोचेल. तर मंगळुरु ते लोकमान्य टिळक टर्मिनस (गाडी क्रमांक ०११८६) २१ ऑक्टोबर ते २ डिसेंबर दरम्यान चालविण्यात येणार आहे.
गोविंदवाडी बायपास रस्ता दुपारी चार ते रात्री एकपर्यंत बंद; नवरात्रोत्सवानिमित्त वाहतुकीत बदल
ही गाडी दर शनिवारी संध्याकाळी ६.४५ मंगळुरू येथून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी २.२५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि, करमाळी, मडगाव, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुरुडेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड, कुंडुरा रोड , उडुपी, मुल्की, सुरथकल आणि ठोकूर येथे थांबा देण्यात आला आहे. २० ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर दरम्यान दर शुक्रवारी छपरा-लोकमान्य टिळक टर्मिनस-सिवान दरम्यान ०५०६३ वातानुकूलित साप्ताहिक अतिजलद विशेष रेल्वेगाडी चालविण्यात येणार आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात पुढील दोन दिवस तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता
ही गाडी दुपारी ४.१५ वाजता छपरा येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७.२५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहचेल. २२ ऑक्टोबर ते २६ नोव्हेंबरपर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस ते सिवान दरम्यान गाडी चालविण्यात येणार आहे. ही गाडी रविवारी दुपारी १२.४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल आणि दुस-या दिवशी पहाटे ३.१५ वाजता सिवान येथे पोहोचेल. या गाडीला सिवान, देवरिया सदर, गोरखपूर जंक्शन, खलीलाबाद, बस्ती, गोंडा, बादशहानगर, ऐशबाग, कानपूर सेंट्रल, भारवा सुमेरपूर, रागौल, बांदा, चित्रकूट धाम, सतना, कटनी, जबलपूर, इटारसी, भुसावळ, नाशिक रोड आणि कल्याण येथे थांबा देण्यात आला आहे.