ठळक बातम्या

अंधेरी पूर्व येथील ‘म्हाडा’च्या पीएमजीपी वसाहतीमधील १७ इमारत धोकादायक

मुंबई दि.१६ :- अंधेरी पूर्व येथील ‘म्हाडा’च्या पीएमजीपी वसाहतीमधील १७ इमारत धोकादायक झाल्या आहेत. येथे सुमारे पाच हजार रहिवासी राहात आहेत.

वसई, विरारमध्ये ‘महारेल’तर्फे ४ रेल्वे उड्डाणपूल

या इमारतींना ३०हून अधिक वर्ष झाली असून अनेक इमारतींना टेकू लावण्यात आले आहेत. काही इमारती कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राहिवाशांकडून स्थलांतर करण्याची मागणी करण्यात येत आहे.

मुसलमानांना नवरात्रोत्सवात सहभागी व्हायचे असेल, तर त्यांनी हिंदु धर्मात प्रवेश करावा- आमदार नितेश राणे

गेल्या १६ वर्षांपासून या इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे. घरातील स्लॅब व छताचा भाग कोसळणे, प्लास्टर निखळणे अशा घटना वारंवार घडत आहेत. इमारतींच्या पुनर्विकासासाठी विधानसभेत अनेक वेळा लक्षवेधी, तारांकित प्रश्न, औचित्याचा मुद्दा उपस्थित केला गेला. म्हाडाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे बैठकाही घेण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *