ठळक बातम्या

मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील १,५२८ मुले शाळाबाह्य

मुंबई दि.१६ :- राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील १,५२८ मुले शाळाबाह्य आढळून आली आहेत. यापैकी फक्त पालघर जिल्ह्यात ९२८ विद्यार्थी शाळाबाह्य विद्यार्थी आढळून आले असून यातील ६७६ मुले डहाणू तालुक्यातील आहेत.

अंधेरी पूर्व येथील ‘म्हाडा’च्या पीएमजीपी वसाहतीमधील १७ इमारत धोकादायक

राज्यातील शाळाबाह्य, स्थलांतरीत आणि शाळांमध्ये नियमित उपस्थित नसलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी १७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्टदरम्यान मोहीम राबविण्यात आली होती. या शाळाबाह्य मुलांमधील २६३ विद्यार्थी आतापर्यंत कधीच शाळेत गेले नसल्याचे समोर आले आहे. शिक्षण विभागाने यातील ५८२ विद्यार्थ्यांना शाळेत दाखल केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *