नवरात्रोत्सवास उद्यापासून सुरुवात; महालक्ष्मी मंदिर परिसरावर सीसी टीव्ही कॅमेऱ्याची नजर
मुंबई दि.१४ – शारदीय नवरात्रोत्सव उद्यापासून (रविवार ) सुरू होत असून त्यानिमित्त मुंबईमधील महालक्ष्मी मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच महालक्ष्मी मंदिर परिसरावर सीसी टीव्ही कॅमेऱ्याची नजर असणार आहे.
नवरात्रोत्सवात रात्री उशिरापर्यंत मेट्रो रेल्वे सुरू राहणार
नवरात्रोत्सवानिमित्त महालक्ष्मी मंदिरात मोठ्या संख्येने भाविक येत असतात. ललिता पंचमी, अष्टमी व सुट्टीच्या दिवशी ही संख्या तीन लाखांवर जाते. नवरात्रोत्सवात मंदिर पहाटे ५.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांना लवकरच सुरुवात
मंदिराच्या आवारात व हाजीअलीपर्यंतच्या परिसरात सुमारे ६२ सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून ५० सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. मंदिरामध्ये एक रुग्णवाहिका व सकाळ-संध्याकाळ १२ डॉक्टरांचे पथकही तैनात करण्यात आले आहे..