नवरात्रोत्सवात रात्री उशिरापर्यंत मेट्रो रेल्वे सुरू राहणार
मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या मार्गिकांवर अतिरिक्त १४ फेऱ्या
मुंबई दि.१४ – मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) अध्यक्ष तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवरात्रोत्सवानिमित्त रात्री साडे बारा वाजेपर्यंत मेट्रो रेल्वे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ नवरात्रोत्सवानिमित्त १९ ते २३ ऑक्टोबरदरम्यान ही सेवा उपलब्ध असणार आहे.
सरकारने निर्णय कॅबिनेटमध्ये घ्यायचे असतात कोणाच्या घरी नाही – अतुल लोंढे
नवरात्रोत्सवादरम्यान मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या मार्गिकांवर अतिरिक्त १४ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. आता शेवटची मेट्रो रात्री १०.३० ऐवजी रात्री १२.३० वाजता सोडण्यात येणार आहे. अंधेरी पश्चिम आणि गुंदवलीवरून रात्री १२.३० वाजता शेवटची मेट्रो सुटणार आहे.