टिटवाळा, शहाड रेल्वे स्थानकांचा रेल्वे विकास मंडळाच्या माध्यमातून विकास
मुंबई दि.११ :- मध्य रेल्वेवरील शहाड आणि टिटवाळा रेल्वे स्थानकांचा मुंबई रेल्वे विकास मंडळाच्या माध्यमातून विकास करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. रेल्वेच्या अमृत योजनेतून ही कामे केली जात असून या कामांसाठी ३३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
नवी मुंबईत दोन हजारांहून अधिक दुचाकी चालक विनाहेल्मेट; ११ लाख ४५ हजार रुपये दंड वसूल
टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटक बंद करून त्या ठिकाणी पूल उभारणीचे काम सुरू आहे. अमृत योजनेतून टिटवाळा रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूला सरकता जिना, उद्वाहन, तिकीट खिडक्या, वाहनतळ अशा सुविधा दिल्या जाणार आहेत.
मुंबई सेंट्रल ते बोरिवली सहाव्या मार्गिकेच्या जोडणी कामामुळे दररोज २५० लोकल फेऱ्या रद्द
टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटक बंद करून या फाटकावर रेल्वेने उड्डाण पूल बांधण्याचे काम हाती घेतले असून या कामासाठी ५० कोटी ५३ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. तर शहाड रेल्वे स्थानकात प्रवासी सुविधांसाठी अमृत योजनेतून आठ कोटी ३९ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.