बृहन्मुंबई महापालिकेतील कर्मचारी- कामगारांना २० टक्के दिवाळी बोनस देण्याची मागणी
कामगार कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीचे निवेदन
मुंबई दि.११ :- बृहन्मुंबई महापालिकेतील सर्व कामगार कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीने दिवाळी सानुग्रह अनुदानाच्या (बोनस) मागणीसाठी महापालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची भेट घेतली. महापालिका कर्मचाऱ्यांना यावर्षी वार्षिक उत्पन्नाच्या २० टक्के बोनस द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
टिटवाळा, शहाड रेल्वे स्थानकांचा रेल्वे विकास मंडळाच्या माध्यमातून विकास
समन्वय समितीचे अध्यक्ष बाबा कदम यांच्यासह इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. समितीने चहल यांना सादर केलेल्या निवेदनात ही मागणी करण्यात आली आहे. महापालिकेतील कामगार, कार्यालयीन कर्मचारी, अभियंते, तंत्रज्ञ, स्वच्छता निरीक्षक, परिचारिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सुरक्षा रक्षक, अग्निशमन दलातील जवान आदी कायम कर्मचाऱ्यांबरोबरच विविध खात्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही बोनस द्यावा, अशी मागणी समन्वय समितीने केली.
नवी मुंबईत दोन हजारांहून अधिक दुचाकी चालक विनाहेल्मेट; ११ लाख ४५ हजार रुपये दंड वसूल
तसेच बोनसच्या रकमेतून आयकर व अन्य कर परस्पर कापून घेतले जातात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पूर्ण बोनस मिळत नाही. परिणामी, बोनसच्या रकमेतून आयकर कापू नये किंवा अनिवार्य असल्यास पुढील पगारातून कापून घ्यावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.