रसायनाची पिंपे असलेला टँकर कलंडला
पनवेल दि.१० :- मुंब्रा पनवेल महामार्गावरील नावडे फाटा येथे आज सकाळी २५ मेट्रीक टन हायड्रोजन पेरॉक्साइड ड्रमने भरलेला टँकर कलंडला. रस्त्याचा अंदाज न आल्याने वळसा घेत असताना टँकर कलंडल्याचे टँकर चालकाकडून सांगण्यात आले.
ठाणे रेल्वे स्थानकात तीन हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई; साडेआठ लाखांहून अधिक रुपयांचा दंड वसूल
टँकर कलंडल्यानंतर धूर येऊ लागल्याने परिसरात घबराट पसरली होती. नावडे फाटा येथे महामार्गालगत शाळा असल्याने पोलिसांनी तातडीने नावडे फाटा ते रोडपाली जंक्शन दरम्यानची वाहतूक बंद केली.
मुंबईत येत्या २७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान ‘मामी’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन
टँकरच्या चालकाला महामार्गावरील प्रवाशांनी टँकरची काच फोडून सुरक्षित बाहेर काढले. टॅंकरमधील रसायन रस्त्यावर पसरले होते. तळोजा पोलीस, तळोजा वाहतूक शाखा आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अग्निशमन दलाच्या जवानांनी रस्त्यावर पाणी मारून रस्ता स्वच्छ केला.