अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिर परिसराचे सुशोभीकरण
भारतीय पुरातत्व विभाग आणि राज्य शासनाची मंजुरी
अंबरनाथ दि.१० :-अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिर परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. मंदिराच्या मूळ संरचनेला कोणताही धक्का न लावता सुशोभिकरणात अनेक वास्तूंची उभारणी करण्यात येणार आहे. स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून काही वर्षांपूर्वी येथे कला महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. भारतीय पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार मंदिरापासून १०० मीटर अंतरामधील दुरुस्ती, नुतनीकरण कामे आणि १०० मीटर अंतराबाहेरील बांधकाम अशा दोन भागातील कामांचा प्रस्ताव नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. प्रशांत रसाळ यांनी भारतीय पुरातत्व विभागाकडे सादर केला होता.
रसायनाची पिंपे असलेला टँकर कलंडला
काही महिन्यांपूर्वी मंदिर दुरुस्ती आणि नुतनीकरणाच्या कामांसह बांधकाम स्वरुपातील कामांना पुरातत्व विभागाने तर शिवमंदिर परिसर सुशोभीकरणाच्या कामासाठी १३८.२१ कोटी किंमतीच्या प्रस्तावाला राज्य शासनाने मंजुरी दिली. त्यानंतर अंबरनाथ नगरपालिकेकडून काही महिन्यांपूर्वी सुशोभीकरण कामासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सावनी हेरिटेज कंझर्वेशन प्रा.ली. या कंपनीला १०७ कोटी रुपयांच्या विविध कामाचे कार्यादेश देण्यात आले.
ठाणे रेल्वे स्थानकात तीन हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई; साडेआठ लाखांहून अधिक रुपयांचा दंड वसूल
सुशोभीकरणाचे संपूर्ण काम काळया पाषाणात केले जाणार आहे. यात प्रवेशद्वार, प्रवेशद्वारासमोरील चौकात नंदी, वाहनतळ, प्रदर्शन केंद्र,अँम्पी थिएटर, संरक्षक भिंत, मुख्य रस्ता व अंतर्गत रस्ते, क्रिडांगण आणि स्वच्छतागृह, बंधारा, भक्त निवास, घाट आणि संरक्षक भिंत यांचा समावेश आहे.