मेट्रो ३ भूमिगत कॉरिडॉरची पहिली लांब पल्ल्याची चाचणी यशस्वी
मुंबई, दि. ९
मेट्रो ३ भूमिगत कॉरिडॉरची पहिली लांब पल्ल्याची चाचणी काल (रविवारी) यशस्वी पार पडली. मेट्रो ट्रेनने एमआयडीसी ते विद्यानगरी या आठ किलोमीटर मार्गावरील सहा स्थानके पार केली.
आरे ते कफ परेड कॉरिडॉर अर्थात ॲक्वा लाईनचा पहिला टप्पा असलेल्या आरे आणि वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) दरम्यान वर्षाच्या अखेरीस सेवा सुरु करण्याची मेट्रो प्राधिकरणाची योजना आहे.
प्रवासाचा कालावधी २५ मिनिटांचा असून ११० सेवांसाठी नऊ मेट्रो गाड्यांची आवश्यकता असेल, त्यापैकी आठ वितरीत करण्यात आल्या आहेत, तर उर्वरित ट्रेन महिन्याच्या अखेरीस येणे अपेक्षित आहे.
—-