अपंग व्यक्तींना योग्य संधी आणि व्यासपीठ देण्याची गरज : राज्यपाल रमेश बैस
मुंबई दि.०६ :- अनेक अपंग व्यक्ती कला – क्रीडा क्षेत्रात सामान्य व्यक्तींपेक्षा अधिक प्राविण्य मिळवतात. काही कलाकार पायाने तर काही दातांनी ब्रश धरून चित्रे काढतात.विशेष ऑलिम्पिकमध्ये अपंग खेळाडू अनेक क्रीडा प्रकारांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करत आहेत. अपंगांना सहानुभूती नको, तर योग्य संधी आणि व्यासपीठ देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.
जोगेश्वरी मुंबई येथील ‘नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड’ (नॅब) या संस्थेचा उपक्रम असलेल्या ‘एम एन बनाजी इंडस्ट्रियल होम फॉर द ब्लाइंड’ या संस्थेतील युवा अपंग विद्यार्थ्यांनी राज्यपाल बैस यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
शहरी नक्षलवादाच्या प्रतिबंधासाठी सक्षम यंत्रणा हवी
बस स्टेशन, रेल्वे स्टेशन्स, शासकीय कार्यालये, महाविद्यालये व इतर सार्वजनिक संस्था दिव्यांगांकरिता प्रवेश व प्रवासाच्या दृष्टीने सुलभ असल्या पाहिजे असे राज्यपाल बैस यांनी सांगितले. राज्यपाल बैस यांनी संस्थेला पाच लाख रुपयांची देणगी जाहीर केली. ‘नॅब’च्या कार्यकारी संचालिका पल्लवी कदम, सामाजिक कार्यकर्त्या बबिता सिंह, क्रीडा प्रशिक्षक चार्ल्स आदींनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. अपंग व्यक्तींनी यावेळी स्वतः तयार केलेल्या वस्तू राज्यपालांना भेट दिल्या.