महापालिकेच्या चार हजार आरोग्यसेविकांचे उद्या आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन
मुंबई दि.०३ :- बृहन्मुंबई महापालिकेच्या चार हजार आरोग्यसेविका उद्या ( ४ ऑक्टोबर) रोजी आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन करणार आहेत. महापालिकेच्या विविध सेवा घरोघरी पोहोचविण्याचे काम करणाऱ्या आरोग्य सेविकांच्या अनेक मागण्या गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहेत.
सोयाबीनवर रोगाचा प्रादुर्भाव; तातडीने पिकांचे पंचनामे करा – कृषी, मदत, पुनर्वसन विभागाला आदेश
गेल्यावर्षी ऑक्टोबर २०२२ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य सेविकांच्या प्रश्नासंबंधी संयुक्त बैठक घेवून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. परंतु वर्षभरात मुख्यमंत्र्यांनी आरोग्यसेविकांना चर्चेसाठी वेळ दिलेला नाही, असा आरोप आरोग्य सेविका संघटनेकडून करण्यात आला आहे.
दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा – मैदा, पोह्याचाही समावेश
किमान वेतन रू अठरा हजार व भविष्य निर्वाह निधी, निवृत्ती वेतन या मागण्यांवर न्यायालयाने आदेश देऊनही बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाने त्याची अंमलबजावणी केली नाही, असे संघटनेचे म्हणणे आहे.