मेट्रो ३ मार्गिकेतील आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्यातील आठ गाड्या मुंबईत दाखल
मुंबई दि.२१ – कुलाबा ते वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेतील आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्यातील आठ गाड्या मुंबईत दाखल झाल्या आहेत.
आता केवळ एका गाडीची प्रतीक्षा असून ही गाडीही येत्या काही दिवसात आरे कारशेडमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशातील श्रीसिटीवरून एमएमआरसीच्या माध्यमातून मेट्रो ३ चे काम सुरु आहे. मेट्रो गाड्या मुंबईत आणून त्यांची चाचणी घेण्याच्या कामालाही वेग आला आहे.