वाहतूक दळणवळण

मध्य रेल्वेतर्फे स्वच्छता पंधरवडा उपक्रमास सुरुवात

मुंबई दि.१६ :- मध्य रेल्वेतर्फे स्वच्छता पंधरवडा उपक्रमास आजपासून सुरुवात झाली असून हा उपक्रम येत्या २ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. उपक्रमात मध्य रेल्वेवरील स्थानके, रेल्वे कार्यालये, वसाहती, कारखाने, देखभाल डेपो, रुग्णालये यांची स्वच्छता करण्यात येणार आहे.

छांदिष्ट, हौशी कलाकारांच्या सृजनशीलतेला हक्काचे व्यासपी

प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करण्यासाठी विविध कार्यालये, युनिट्स आणि डेपोमध्ये श्रमदान आणि वृक्षारोपण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून स्वयंसेवी संस्था आणि सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. पर्यावरण व स्वच्छता प्रकल्पाबाबत विविध नाविन्यपूर्ण कामे सुरू करण्यात आली आहेत.

कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना पथकर माफ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

स्वच्छता पंधरवड्यादरम्यान स्पर्धा आणि जनजागृती यात्रा काढण्यात येणार असून ‘प्लास्टिकला नाही म्हणा’ हा संदेश देण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी यांनी शुक्रवारी मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *