ठळक बातम्या

छांदिष्ट, हौशी कलाकारांच्या सृजनशीलतेला हक्काचे व्यासपी

‘सृजन’ कलादालनाचे येत्या २१ सप्टेंबरला उदघाटन

डोंबिवली दि.१६ :- छंदिष्ट आणि हौशी कलाका रांच्या सृजनशीलतेला वाव देण्यासह त्यांच्यासाठी हक्काचे ‘सृजन कलादालन’ डोंबिवलीत उपलब्ध झाले आहे. येत्या २१ सप्टेंबर रोजी शैलजा नवरे यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता या कलादालनाचे उदघाटन होणार आहे. नवरे प्लाझा, तळ मजला, वाहतूक पोलीस शाखेसमोर, रामनगर, डोंबिवली पूर्व येथे कायमस्वरूपी कलादालन तयार करण्यात आले आहे.

थायरॉईड विषयक उपचारासाठीची अत्याधुनिक सूक्ष्म शस्त्रक्रिया महापालिका रुग्णालयांत यशस्वी

कलादालनाच्या उदघाटनानिमित्त विविध कलाकारांचे ‘आविष्कार’ कला प्रदर्शन २१ ते २४ सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १०.३० ते रात्री ८.३० या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे.

डोंबिवली पूर्व भागातील धोकादायक इमारत कोसळली – दोन जण अडकले असण्याची शक्यता

प्रदर्शनात रमेश दाते यांनी करवंटीच्या कवचातून साकारलेल्या गणेश मूर्ती , आशिष नवरे यांनी करवंटीतून घडविलेल्या कलात्मक वस्तू, संतोष काळे यांच्या काष्ठ कलाकृती, लेखा नवरे देशपांडे आणि तृप्ती मोडक यांनी कापडापासून बनवलेली शैक्षणिक खेळणी, अरुणा नवरे यांनी नैसर्गिक पानाफुलांपासून साकारलेल्या कलाकृतींचा समावेश आहे. हे कला दालन सुरू झाल्यानंतर येथे कलाविषयक विविध उपक्रम राबविण्याचा मानस या कलादालनाचे संकल्पक आशिष नवरे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *