शिवकालीन किल्ले केवळ महाराष्ट्राचाच नाही तर संपूर्ण देशाचा जिवंत सांस्कृतिक वारसा – राज्यपाल बैस
मुंबई दि.१५ :- राज्यातील प्रत्येक गडकिल्ल्याची स्वतःची गाथा आहे. रायगड, शिवनेरी, सिंहगड, प्रतापगड हे शिवकालीन किल्ले केवळ महाराष्ट्राचाच नाही, तर संपूर्ण देशाचा जिवंत सांस्कृतिक वारसा आहे. हे किल्ले राज्याचे तसेच संस्कृतीचे रक्षक असून तज्ज्ञांच्या मदतीने त्यांचे रक्षण व जीर्णोद्धार करून तिथे शैक्षणिक पर्यटन वाढविले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.
कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना पथकर माफ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे देण्यात येणारे तिसरे ‘शिखर सावरकर’ पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी राज्यपाल बैस बोलत होते. ज्येष्ठ गिर्यारोहक व हिमालयाचे अभ्यासक हरीश कपाडिया यांना राज्यपालांच्या हस्ते ‘शिखर सावरकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर मोहन हुले यांना ‘शिखर सावरकर युवा साहस पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावर्षीचा ‘शिखर सावरकर दुर्ग संवर्धन पुरस्कार’ ऐतिहासिक किल्ल्यांच्या परिरक्षणासाठी कार्य करणाऱ्या ‘दुर्गवीर प्रतिष्ठान’ या संस्थेला देण्यात आला. दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने अजित राणे, नितीन पाटोळे व संतोष हसूरकर यांनी पुरस्कार स्वीकारला.
मध्य रेल्वेकडून पाससंदर्भातील नियमांची कठोर अंमलबजावणी; प्रवाशांमध्ये नाराजी
स्वातंत्र्यवीर सावरकर जातीभेदाचे कडवे विरोधक होते. त्यामुळे जातीभेद समाप्त करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही राज्यपाल बैस म्हणाले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ५० व्या पुण्यतिथीच्या वर्षी काही गिर्यारोहकांनी हिमाचल प्रदेश येथे आजवर सर केले नाही असे शिखर सर केले होते. व त्या शिखराला २०१८ साली ‘शिखर सावरकर’ हे नाव दिले गेले, अशी माहिती स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी यावेळी दिली. गिर्यारोहक हरीश कपाडिया यांनी त्यांना मिळालेला पुरस्कार त्यांचे सुपुत्र हुतात्मा लेफ्टनंट नवांग कपाडिया यांना समर्पित करीत असल्याचे यावेळी सांगितले.